More
    HomeMaharashtraAkolaरॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 178 चाचण्या, आठ पॉझिटिव्ह

    रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 178 चाचण्या, आठ पॉझिटिव्ह

    अकोला,दि. 27 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 178 चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.           

     आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे-  अकोला ग्रामिण येथे तीन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, बाळापूर येथे 11 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, बार्शिटाकळी येथे दोन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तेल्हारा येथे 19 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तसेच अकोला आयएमए येथे नऊ चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, 70 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, वैद्यकीय महाविद्यालय येथे  57  चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर हेडगेवार लॅब येथे सात चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, असे दिवसभरात 178  चाचण्यांमध्ये आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर आजपर्यंत 24899 चाचण्या झाल्या त्यात 1756 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

    Read more –

    https://dio-akola.blogspot.com/2020/11/178.html

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img