More
    HomeABP Live Marathiस्वप्नं बघितली तरच खरी होतात सांगणारा 'सातारचा सलमान'!

    स्वप्नं बघितली तरच खरी होतात सांगणारा ‘सातारचा सलमान’!


    Satarcha Salman : हिरो बनण्याचं स्वप्न अनेक जण बघतात. त्यातील काहींचेच स्वप्न सत्यात उतरते. याच विषयावर भाष्य करणारा ‘सातारचा सलमान’ (Satarcha Salman) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. ‘स्वप्नं बघितली तरंच पूर्ण होतात’, अशी भावना असणाऱ्या तरुणाची हिरो बनण्याची जिद्द, त्यासाठीची त्याची धडपड या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा 3 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

    ‘सातारचा सलमान’ सिनेमाच्या ट्रेलरमध्ये काय आहे? 

    ‘सातारचा सलमान’ या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये,”साताऱ्यात राहणारा एक सामान्य मुलगा हिरो बनण्याचे स्वप्न बघताना दिसत आहे. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठीची त्याची मेहनत, त्याचा सामान्य मुलगा ते हिरो बनण्यापर्यंतचा खडतर प्रवास, या प्रवासात त्याच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी केलेली मदत दिसत आहे”. मात्र त्याच्या आयुष्यात आलेले हे चढउतार त्याला कोणत्या वळणावर नेणार आणि त्याच्या समोर आलेली परिस्थिती त्याला खरंच हिरो बनवणार का? याचं उत्तर मात्र ‘सातारचा सलमान’ हा सिनेमा पाहिल्यावरच प्रेक्षकांना मिळणार आहे. 

    तगडी स्टारकास्ट असलेला ‘सातारचा सलमान’

    ‘सातारचा सलमान’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा हेमंत ढोमे सांभाळणार आहे. या सिनेमात सुयोग गोऱ्हे, शिवानी सुर्वे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे, मकरंद देशपांडे, आनंद इंगळे यांच्या प्रमुख भूमिका असून महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, अनिकेत विश्वासराव, नेहा महाजन, कमलेश सावंत यांचीही झलक या सिनेमात पाहायला मिळणार आहे. तगडी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करेल, याचा ट्रेलरवरुन अंदाज येत आहे. 

    हेमंत ढोमे ‘सातारचा सलमान’ या सिनेमाबद्दल म्हणाला,”प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात मोठं होण्याचं स्वप्न बघत असतो आणि या प्रवासात प्रत्येकाच्याच वाटेवर अनेक अडचणी येतात. कधीकधी अशी वेळही येते की, आता सगळं संपलं, असं वाटतं. मात्र आपण वाईटातूनही काही चांगलं बघितलं पाहिजे आणि आयुष्यात पुढे गेलं पाहिजे. आयुष्यात आशावादी आणि सकारात्मक राहणे खूप गरजेचं आहे. आपण आपलं काम करत राहावं, त्यातूनच काहीतरी चांगलं निष्पन्न होतं, ही ऊर्जा देणारा हा सिनेमा आहे. एक धमाल, निखळ मनोरंजन करणारा सिनेमा आहे. हा सिनेमा सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आपल्यातीलच एक वाटेल”. 

    संबंधित बातम्या

    Source

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img