More
    HomeMaharashtraJalgaonहोय, मला ईडीची नोटीस मिळाली, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया

    होय, मला ईडीची नोटीस मिळाली, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया

    जळगाव : होय, मला ईडीची नोटीस मिळाली अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse first reaction after ED notice) यांनी दिली. एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस पाठवल्याची एक्स्लुझिव्ह बातमी टीव्ही 9 मराठीने शुक्रवारी रात्री दाखवली होती. त्या बातमीवर खुद्द एकनाथ खडसे यांनी आता शिक्कामोर्तब केलं. “धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरातील भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीत आले. ईडीची नोटीस आल्यानंतर मला महाराष्ट्रातून फोन येत आहेत. मला सहानुभूतीच मिळत आहे. लोकांना हे आवडत नाही”, असं एकनाथ खडसे म्हणाले. (Eknath Khadse first reaction after ED notice)

    ईडीची नोटीस आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरातून मला जे फोन येत आहे त्यातून सहानुभूती व्यक्त केली जात आहे. लोकांना असं वाटते की हा एक प्रकारचा माझ्यावर अन्याय आहे. वारंवार चौकशा लोकांना आवडलेल्या दिसत नाहीत, पण काही निर्णय असतात, त्या आधीन राहून काम करायचं असतं, असं एकनाथ खडसे म्हणाले. (Eknath Khadse first reaction after ED notice)

    एकनाथ खडसेंना ईडीची नोटीस 

    भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (5 reasons behind ED notice to NCP leader Eknath Khadse) यांना अंमलबजावणी संचलनालय अर्थात ED ने नोटीस पाठवल्याचं (ED Notice) वृत्त आहे. ईयर एण्ड अर्थात वर्षाअखेरिला म्हणजे 30 डिसेंबरला खडसेंना (ED notice to Eknath Khadse) चौकशीसाठी बोलावणं धाडल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर काल ‘टीव्ही 9 मराठी’ने एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा एकनाथ खडसे यांनी अद्याप मला ईडीची नोटीस मिळाली नसल्याचे सांगितले. ही नोटीस मिळाल्यानंतर मी स्वत:ची भूमिका स्पष्ट करेन, असे त्यांनी टीव्ही 9 मराठीला सांगितले. त्यानंतर आज खडसेंनी आपली पहिली प्रतिक्रिया देत, आपल्याला नोटीस आल्याचं सांगितलं.

    अंजली दमानिया ED विरोधात कोर्टात जाणार

    एकीकडे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना ED ने नोटीस (Eknath Khadse) पाठवल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आता थेट ईडी आणि CBI यांनाच कोर्टात खेचण्याचा पवित्रा घेतला आहे. ईडी, (ED) सीबीआयविरोधात (CBI) कोर्टात याचिका दाखल करणार असल्याची माहिती, अंजली दमानिया यांनी टीव्ही 9 मराठीला दिली.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img