More
  HomeTV9Marathi19 लाखांच्या प्रॉपर्टीला कोट्यवधींची बोली, दाऊदची प्रॉपर्टी कुणी खरेदी केली?

  19 लाखांच्या प्रॉपर्टीला कोट्यवधींची बोली, दाऊदची प्रॉपर्टी कुणी खरेदी केली?

  मुंबई | 5 जानेवारी 2024 : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या खेडममधील संपत्तीचा लिलाव झालाय. या लिलावात दाऊदचे जन्मगाव असलेल्या रत्नागिरीतील खेड तालुक्यातील बंगले आणि आंब्याच्या बागा यांचा समावेश आहे. याआधी दाऊदच्या मुंबईतील काही मालमत्तांचा लिलाव झाला होता. त्यानंतर आताच्या यादीत रत्नागिरी येथील मालमत्तेचा समावेश आहे. स्मगलर्स फॉरेन एक्सचेंज मॅन्यूपुलेटर्स अंतर्गत दाऊदची संपत्ती जप्त करण्यात आलीय. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात मुंबके गावात दाऊदची ही संपत्ती आहे. दाऊदच बालपणीच घर आणि त्याच्या कुटुंबाच्या तीन संपत्ती यामध्ये आहेत. दाऊदच्या आईच्या नावावर रजिस्टर संपत्ती चार वर्षापूर्वी जप्त केली. या सगळ्या प्रॉपर्टीची किंमत 19 लाखाच्या आसपास होती. दाऊदच्या चारही संपत्तीच्या लिलावाला आज दुपारी 2 वाजता सुरुवात झाली. बंद लिफाफे उघडून लिलावाला सूरुवात करण्यात आली.

  960) { googletag.cmd.push(function() { googletag.display(“desktop_top_300x250”); }); }]]>

  दाऊदच्या संपत्तीचा लिलाव हा सफेमा कायद्याअंतर्गत आयकर भवनात करण्यात आला. उच्च बोली लावणाऱ्याला दाऊदची मालमत्ता मिळणार होती. या चारही मालमत्ता खेडमधील आहेत. या मालमत्तांमध्ये पहिली जमीन ही 10420.5 चौरस मीटरची आहे, जीची किंमत 9 लाख रूपये घोषित करण्यात आली होती.

  दुसरी 8953 चौरस मीटरची जमीन किंमत आहे तिची किंमत ८,०८,७७० रुपये ठेवण्यात आली होती. तिसरी १७१ चौरस मीटरची शेतजमीन आहे. तिची किंमत १५,४४० रूपये होती. तर चौथी १७३० चौरस मीटरची जमिनीची किंमत १.५ लाख रूपये ठरवण्यात आली होती. यातील तिसऱ्या नंबरची जमीन ही कोट्यवधी रुपयात लिलावाद्वारे विकण्यात आली आहे.

  960) { googletag.cmd.push(function() { googletag.display(‘desktop_medium_300x250’); }); }]]>

  कोट्यवधी रुपयात गेली दाऊदची मालमत्ता

  दाऊदच्या 4 प्रॉपर्टी लिलावासाठी काढण्यात आल्या होत्या. 4 पैकी 3 नंबरच्या जमिनीसाठी 4 जणांनी अर्ज केला होता. चौथ्या जमिनीसाठी 3 जणांनी अर्ज केला होता. दाऊदच्या 3 नंबरच्या जमिनीचा लिलाव हा 2.01 कोटी रुपयात झालाय. तर 4 नंबरच्या प्रॉपर्टीचा लिलाव हा 3.28 लाख रुपयाला लिलाव झालाय. विशेष म्हणजे ऑनलाईन पद्धतीने आधीच अर्ज करून ही जमीन विकत घेण्यात आळी आहे. ई टेंडरमधून जामीन विकत घेण्यात आली होती.

  दाऊदची संपत्ती नेमकी कुणी विकत घेतली?

  मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना नेता आणि वकील अजय श्रीवास्तव यांनी दाऊदच्या खेडमधील मालमत्ता विकत घेतली आहे. अजय श्रीवास्तव यांनी याआधीदेखील दाऊदची संपत्ती विकत घेतली आहे. अजय श्रीवास्तव यांनी 2001 मध्ये देखील दाऊदच्या मुंबईतील संपत्तीवर बोली लावली होती. त्यामध्ये काही दुकानांचा समावेश होता. पण ही संपत्ती सध्या कायद्याच्या कचाट्यात अडकल्याची माहिती आहे.


  Source

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img