More
  HomeNationalDelhi9 तारखेला केंद्र सरकार कृषि कायद्याबाबत मोठा निर्णय घेणार?

  9 तारखेला केंद्र सरकार कृषि कायद्याबाबत मोठा निर्णय घेणार?

  नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवरचं शेतकरी आंदोलन आता अकराव्या दिवसात पोहचलं आहे. सरकार कायद्यातल्या काही बदलांसाठी तयार झाल्याचे संकेत मिळत आहेत तर शेतकरी संघटना मात्र कायदा मागेच घ्यावा यासाठी आक्रमक आहेत. शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये पाचवी बैठकही कुठल्या तोडग्याविनाच संपली. आता पुढच्या बैठकीची तारीख ठरली आहे 9 डिसेंबर, दुपारी 12 वाजता. या बैठकीत सरकार मोठा निर्णय घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  काल पाच तास झालेल्या बैठकीत दोन्ही पक्षांमध्ये किती अविश्वासाचं वातावरण होतं हे समोर आलं. हो किंवा नाही, असं सरकारी फाईलींच्या मागे लिहिलेले फलक शेतकऱ्यांनी भर बैठकीतच हातात घेतले होते. जवळपास अर्धा तास त्यांनी हे मौन धारण केलं होतं. हातावर घडी तोंडावर बोट अशी काहीशी ही स्थिती होती. त्यामुळे बैठक पाच तास चालली तरी त्यातून ठोस असं काही हाती आलंच नाही.

  Read more –

  https://marathi.abplive.com/news/india/central-government-take-a-big-decision-regarding-agriculture-act-835839

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img