More
    HomeTV9MarathiAgriculture News : राज्यभरातील शेतीच्या घडामोडी पाहा एका क्लिकवर

    Agriculture News : राज्यभरातील शेतीच्या घडामोडी पाहा एका क्लिकवर

    धुळे जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने त्याचा फायदा रब्बी पिकांना झाला आहे. या भागात सुमारे दोन लाख हेक्टर पिकाच्या पेरण्या झाल्या असून सर्वाधिक गहू पिकाची लागवड झाली आहे.

    Agriculture News : राज्यभरातील शेतीच्या घडामोडी पाहा एका क्लिकवरfarmer

    Image Credit source: tv9marathi

    वाशिम : जिल्हाभरात काही दिवसांपासून दर दोन दिवसाला वातावरणात (Climate change) बदल होत आहे. कधी उष्णता (heat) वाढत आहे. तर कधी थंड वारे वाहत आहेत. हार्वेस्टरच्या (Harvester Farms) सहाय्याने गव्हाची काढणी केली जाते. त्यामुळे अगदी काही तासामघ्ये शेतातच काढणी केली जात असल्याने शेतकरी (washim farmer) हार्वेस्टरला अधिक पसंती देत असल्याचं दिसून येत आहे. राज्यात सुध्दा वातावरण बदलामुळे अनेक पीकांवर त्याचा परिणाम झाला आहे.

    960) { googletag.cmd.push(function() { googletag.display(“desktop_top_300x250”); }); }]]>

    सध्या स्थितीत कांद्याला फुलधारणा

    वाढता उत्पादन खर्च आणि शेतमालाला मिळणाऱ्या दरामुळे पारंपारिक शेती तोट्यात जात आहे. त्यामुळं वाशिम जिल्ह्यात शेतकरी कांदा बिजोत्पादनकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. वाशिम जिल्ह्यातील वनोजा येथील युवा शेतकरी समीप राऊत यांनी पारंपारिक शेती पद्धतीला फाटा देत, आपल्या दोन एकर शेतात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बीजवाई कांद्याची लागवड केली. सध्या स्थितीत कांद्याला फुलधारणा झाली असून, पीक चांगलेच भरलेले असून मजुरी आणी बियाना चा खर्च वगळता त्यांना सव्वातीन लाख रुपये निव्वळ नफा होण्याचा अंदाज शेतकऱ्यांचा आहे.

    फायदा रब्बी पिकांना

    धुळे जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने त्याचा फायदा रब्बी पिकांना झाला आहे. या भागात सुमारे दोन लाख हेक्टर पिकाच्या पेरण्या झाल्या असून सर्वाधिक गहू पिकाची लागवड झाली आहे. सध्या गहू काढून कृषी उत्पन्न बाजार समिती विकला जात आहे. मात्र या गव्हाला भाव नसल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहे.

    960) { googletag.cmd.push(function() { googletag.display(‘desktop_medium_300x250’); }); }]]>

    हे सुद्धा वाचा

    हरभरा या पिकाचे उत्पन्न चांगले

    धुळे जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झालेला आणि उशिरापर्यंत चालत असलेल्या पावसामुळे या वर्षाचा रब्बी हंगा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरला आहे. रब्बी हंगामात घेतले गेलेले गेलेले गहू, हरभरा या पिकाचे उत्पन्न चांगले निघाले आहे. मात्र असे असले तरी कृषी उत्पन्न बाजार समितीत मात्र गावाला भाव नसल्याने शेतकरी नाराज आहे. गव्हाच्या पेरणीसाठी लागणारा खर्च वजा जाता हातात काही पडत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे .दोन आठवड्यापूर्वी गवाला तीन हजार रुपये इतका भाव होता. मात्र आता हा भाव अवघ्या 2200 ते 2400 रुपयाला आला आहे. त्यामुळे तीन हजार रुपये भाव मिळावा अशा अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.


    Source

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img