More
  HomeMaharashtraAkolaAkola ग्रा.पं. निवडणुक २०२०-२१: तेल्हारा व बाळापूर संपूर्ण तालुक्यात तर उर्वरित क्षेत्रात...

  Akola ग्रा.पं. निवडणुक २०२०-२१: तेल्हारा व बाळापूर संपूर्ण तालुक्यात तर उर्वरित क्षेत्रात ग्रामपंचायत व सीमेलगतच्या गावातही आचारसंहिता

  अकोला,दि. १४ (जिमाका)- जिल्ह्यात ५३२ ग्रामपंचायतींपैकी  २२५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.  त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू नाही. परंतू जिल्ह्यातील तेल्हारा वा बाळापूर या दोन तालुक्यात ५० टक्क्यांहून अधिक ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका असल्याने  त्या संपूर्ण तालुक्यात आचारसंहिता लागू राहिल. तर अन्य तालुक्यात ज्या ग्रामपंचायतींच्या निवडणूका आहेत त्या क्षेत्रात व सिमेलगतच्या गावांमध्येही आचारसंहिता लागू राहिल,असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी स्पष्ट केले असून जिल्ह्यात निवडणूक आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी संबंधित यंत्रणांनी करावी, असे निर्देशही दिले आहेत.

  राज्यनिवडणूक आयोगाने  ग्रामपंचायत निवडणूक २०२०-२१ च्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला असून त्या दिवसांपासून आचारसंहिता लागू झाली आहे.  निवडणूक आयोगाच्या  दि.१४ ऑक्टोबर २०१६, दि.६ सप्टेंबर  २०१७ व दि. ३१ जुलै २०१८ च्या आदेशान्वये ज्या जिल्ह्यात ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका आहेत त्या संपूर्ण जिल्ह्यात आचार संहिता लागू राहिल. ज्या तालुक्यात ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक  ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका आहेत त्या तालुक्यात आचारसंहिता लागू राहिल. तसेच निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीच्या  सिमेलगतच्या गावांमध्येही आचारसंहिता लागू राहिल. अकोला जिल्ह्यात ५३२ ग्रामपंचायतींपैकी  २२५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.  त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू नाही. परंतू जिल्ह्यातील तेल्हारा वा बाळापूर या दोन तालुक्यात ५० टक्क्यांहून अधिक ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका असल्याने  त्या संपूर्ण तालुक्यात आचारसंहिता लागू राहिल. तर अन्य तालुक्यात ज्या ग्रामपंचायतींच्या निवडणूका आहेत त्या क्षेत्रात व सिमेलगतच्या गावांमध्येही आचारसंहिता लागू राहिल. त्यामुळे  ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या  कार्यक्षेत्रात निवडणूका नसतील तेथील विकासकामांवर कसलाही निर्बंध राहणार नाही. मात्र या क्षेत्रात अशी कोणतीही कृती करता येणार नाही  ज्यामुळे निवडणूका होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या  मतदारांवर विपरित प्रभाव पडेल,असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी  स्पष्ट केले आहे.  तथापि सर्व यंत्रणांनी  राज्य निवडणूक आयोगाने  दिलेल्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे आचारसंहितेचे पालन करण्याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img