More
  HomeTV9MarathiAtal Setu Toll Rate | देशातील सर्वात मोठ्या शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूचा...

  Atal Setu Toll Rate | देशातील सर्वात मोठ्या शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूचा टोल किती ? सिंगल, रिर्टन आणि पासचे रेट काय?

  मुंबई | 12 जानेवारी 2024 : देशातील सर्वात मोठ्या शिवडी ते न्हावा शेवा अटल सागरी सेतूमुळे दक्षिण मुंबई ते नवीमुंबई हे अंतर अवघ्या 15 ते 20 मिनिटांत कापता येणार आहे. सध्या या अंतराला रस्ते मार्गाने जाण्यासाठी दोन तास लागतात. या मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. 21.8 किलोमीटरचा हा मार्ग देशातील सर्वात मोठा सागरी मार्ग ठरला आहे. या मार्गाचे नामकरण माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू असे करण्यात आले आहे. या मार्गावरुन टोल किती आकारला जाणार आहे ते आपण पाहुयात…

  960) { googletag.cmd.push(function() { googletag.display(“desktop_top_300x250”); }); }]]>

  शिवडी ते न्हावा शेवा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक या मार्गाला 21,200 कोटी खर्च करून तयार करण्यात आले आहे. यातील 15 हजार कोटी रुपये कर्जातून उभारण्यात आले आहे. या मार्गावरुन एकेरी प्रवासासाठी कार करीता 250 रुपये टोल आकारण्याचा निर्णय 4 जानेावारी रोजी घेण्यात आला आहे. हा मार्ग नागरिकांसाठी सुरु होताच त्यावरुन विविध प्रकारच्या वाहनांसाठी खालील प्रमाणे दर आकारण्यात येणार आहेत. या सागरी सेतूसाठी कार साठी ( रिर्टन जर्नी ) परतीच्या प्रवासासाठी 375 रुपयांचा टोल आकारण्यात येणार आहे. तर मासिक आणि दैनंदिन पासाचा दर अनुक्रमे 12,500 रुपये आणि 625 रुपये असणार आहे.

  हा पाहा टोल रेटचा तक्ता –

  960) { googletag.cmd.push(function() { googletag.display(‘desktop_medium_300x250’); }); }]]>

  Atal Setu toll rates

  Atal Setu toll rates

  लाईट कमर्शियल व्हेईकल ( LCVs ) आणि मिनी बससाठी सिंगल जर्नीसाठी 400 रु. रिर्टन जर्नी साठी 600 रु. तर दैनंदिन पास आणि मासिक पाससाठी अनुक्रमे 1000 रु. आणि 20,000 रु. टोल दर असणार आहे. बस आणि टु एक्सेल ट्रकसाठी एकेरी प्रवासासाठी 830 रु. आणि परतीच्या प्रवासासाठी 1,245 रु. तर दैनंदिन पास आणि मासिक पासासाठी अनुक्रमे 2,075 रु. आणि 41,500 रु. टोल असणार आहे.

  मल्टी एक्सेल व्हेईकल ( MAVs – 3 axel) साठी एकेरी प्रवासासाठी 905 रु. आणि परतीच्या प्रवासासाठी 1,360 रु. आणि दैनंदिन पास आणि मासिक पासासाठी अनुक्रमे 2,265 रु. आणि 45,250 रु. टोल दर असणार आहे. MAVs (4 to 6 axle) साठी एकेरी प्रवासासाठी 1,300 रु. तर परतीच्या प्रवासासाठी 1,950 रु. आणि दैनंदिन पास आणि मासिक पासासाठी अनुक्रमे 3,250 रु. आणि 65,000 रु. टोल असणार आहे. ओव्हरसाईज व्हेईकलसाठी एकेरी प्रवासासाठी 1,580 रु. आणि परतीच्या प्रवासासाठी 2,370 रु. आणि दैनंदिन पास आणि मासिक पासासाठी अनुक्रमे 3,950 रु. आणि 79,000 रु. टोल आकारण्यात येणार आहे.


  Source

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img