More
  HomeTV9MarathiAyodhya Ram Mandir : कसं असणार अयोध्येतील रामलल्लाचं भव्य मंदिर? मॉडेलच्या माध्यमातून...

  Ayodhya Ram Mandir : कसं असणार अयोध्येतील रामलल्लाचं भव्य मंदिर? मॉडेलच्या माध्यमातून जाणून घ्या खास वैशिष्ट्य

  Ram Mandir Ayodhya Features : येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत बहुप्रतिक्षित अशा रामलल्लाचं भव्य दिव्य मंदिराचं लोकार्पण होणार आहे. रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यासोहळ्याच्या निमित्ताने देशभरातील कोट्यावधी रामभक्त अयोध्येत दाखल होण्याची शक्यता आहे. १०० हून अधिक वर्ष ज्या रामाच्या मंदिराचा वाद सुरू होता अखेर तो संपुष्टात येऊन आता अयोध्येत उभारल्या जात असलेल्या रामलल्लाच्या भेटीची आस रामभक्तांना लागली आहे. जाणून घ्या राममंदिराची नेमकी काय आहे खास वैशिष्ट्य… राम मंदिर हे पारंपरिक नागर शैलीत बनवलं जात असून मंदिराची लांबी ३८० फूट, रूंदी २५० फूट आणि उंची १६१ फूट आहे. तीन मजली असणाऱ्या या मंदिराच्या प्रत्येक मजल्याची उंची २० फूट, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. मुख्य गाभाऱ्यात रामाचं बालरुप तर, पहिल्या मजल्यावर श्रीरामाचा दरबार असणार आहे. मंदिरात ५ मंडप असतील. नृत्य मंडप, रंग मंडप, सभा मंडप, प्रार्थना मंडप आणि किर्तन मंडप असतील. मंदिराच्या खांब आणि भिंतींवर देवी-देवतांच्या मूर्ती कोरलेल्या असणार आहेत. दिव्यांग आणि वृद्धांसाठी मंदिरात रॅम्प आणि लिफ्टची विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे.

  Source

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img