मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आंदोलनाच्या विरोधात ट्वीट केल्यामुळे चर्चेत आहे. याचवरुन तिच्यात आणि अभिनेता दिलजीत दोसांजमध्येही ट्विटर वॉर झालं होतं. अशातच आता कंगनाने शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ संदर्भात ट्वीट केलं आहे. कंगनाचं हे ट्वीट वेगाने व्हायरल होत आहे. कंगना रनौत ‘भारत बंद’च्या विरोधात आहे. अशातच तिने एका वेगळ्या अंदाजात भारत बंदचा विरोध केला आहे. कंगना रनौतने सद्गुरूंचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. ज्यामध्ये आंदोलनाबाबत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
Read more –