More
  HomeNationalBJP राष्ट्रीय अध्यक्ष नड्डांच्या ताफ्यावर हल्ला प्रकरण, भाजप आक्रमक, बंगालच्या राज्यपालांचे ममतांवर...

  BJP राष्ट्रीय अध्यक्ष नड्डांच्या ताफ्यावर हल्ला प्रकरण, भाजप आक्रमक, बंगालच्या राज्यपालांचे ममतांवर आरोप

  कोलकाता : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर पश्चिम बंगालमध्ये हल्ला झाल्यानंतर त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. नड्डा यांच्या गाडीवर काल दगड फेकण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला होता. आज मुंबईमध्ये भाजपचे आमदार राम कदम यांच्या नेतृत्वात पश्चिम बंगालमधील नागरिकांना घेऊन ममता बॅनर्जी यांचा निषेध करण्यात आला. तिकडे बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी पत्रकार परिषद घेऊन बंगालच्या कायदा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. ते म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये कायदा व्यवस्था खूप खराब आहे. जेपी नड्डा यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक व्यवस्था नव्हती. कायदा व्यवस्थेसंदर्भात याप्रकरणी राज्याचे मुख्य पोलिस महासंचालक आणि मुख्य सचिवांना समन्स पाठवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने देखील या घटनेची गंभीर दखल घेतली असून संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.

  Read more –

  https://marathi.abplive.com/news/india/bjp-national-president-nadda-convoy-attacked-in-west-bengal-bjp-aggressive-bengal-governor-accuses-mamata-banerjee-837518

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img