More
  HomeNationalEarthquake : दिल्लीच नव्हे, इतर राज्यांतही भूकंपाचे धक्के; असं नेमकं का होतंय?

  Earthquake : दिल्लीच नव्हे, इतर राज्यांतही भूकंपाचे धक्के; असं नेमकं का होतंय?

  Earthquake गुरुवारी रात्रीच्या सुमारास दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. भुकंपाचे धक्के जाणवताच नागरिकांनी घराबाहेर येत सुरक्षितेचे काही उपाय अवलंबले. मुख्य म्हणजे गुरुवारी फक्त दिल्ली एनसीआर भागच नव्हे, तर नोएडा, गाजियाबाद या भागांसह मणिपूर आणि राजस्थानमध्येही भूकंप जाणवल्याचं म्हटलं गेलं.

  दिल्ली एनसीआरमध्ये रात्री भूकंप

  रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दिल्ली एनसीआर भागात भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घराबाहेर आले. सुरुवातीला या भूकंपाची तीव्रता कळू शकली नाही. पण, त्यानंतर हाती आलेल्या माहितीनुसार 4.2 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा हा भूकंप असल्याचं म्हटलं गेलं. भूकंपाचं केंद्र गुरुग्रामपासून 48 किलोमीटर दूर दक्षिण पश्चिम दिशेला असल्याचं सांगण्यात येत आहे.

  सीकरही हादरलं

  राजस्थानमधील सीकरमध्येही गुरुवारी सायंकाळच्या सुमारास भूकंपाचे हादरे बसले. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार य भूकंपाची तीव्रता 3.0 रिश्टर स्केल असल्याचं सांगण्यात आलं. यासंबंधीच्या वृत्ताला भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या (MoES) राष्ट्रीय विज्ञान केंद्रानं (NCS)नंही दुजोरा दिला.

  मणिपूरमध्येही जाणवला भूकंप

  नॅशनल सेंटर ऑफ सिस्म़ोलॉजीनुसार गुरुवरी रात्री मणिपूरनजीक असणाऱ्या Moirang मध्ये 3.2 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप आल्याची माहिती समोर येत आहे. या भूकंपाचं केंद्र Moirang  मणिपूरपासून 38 किलोमीटर दक्षिणेकडे होतं. भारतीय वेळेनुसार हा भूकंप रात्री 10.03 वाजता आला.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img