Farmer Protest : कृषी कायद्यावर शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यातील तिढा काही सुटायचं नाव घेत नाही. शेतकरी जिथे गेल्या काही दिवसांपासून आपल्या मागण्यांवर ठाम असून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. अशातच केंद्र सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे की, ते नव्या कृषी कायद्यांमध्ये काही बदल करु शकतात, पण ते रद्द करु शकत नाही. दरम्यान, दिल्लीच्या बॉर्डरवर गेल्या 20 दिवसांपासून आंदोलन करणारे शेतकरी आणि सरकारच्या या लढाईत आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण शेतकऱ्यांचं आंदोलन दिल्लीच्या वेशीवर सुरु राहणार की, त्यांनी दुसऱ्या स्थळी हलवण्यात येईल, याबाबत देशाचं सर्वोचं न्यायालय आपला निर्णय देणार आहे.
Read more –