More
  HomeABP Live MarathiGemini Horoscope Today 27 February 2023 : मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस...

  Gemini Horoscope Today 27 February 2023 : मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यस्त, राशीभविष्य


  Gemini Horoscope Today 27 February 2023 : मिथुन आजचे राशीभविष्य, 27 फेब्रुवारी 2023: मिथुन राशीच्या लोकांसाठी सोमवारचा पहिला दिवस खूप व्यस्त असेल. तसेच, आज तुम्हाला पैशांची गुंतवणूक टाळण्याची आवश्यकता आहे. मिथुन राशीच्या लोकांसाठी सोमवारचा दिवस योजनांवर लक्ष केंद्रित करण्याचा दिवस असेल. ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या अधिकार्‍यांचेही सहकार्य मिळेल. प्रसारमाध्यमांवर आधारित कामांमध्ये कामाचा ताण अधिक असणार आहे. नोकरी व्यवसायात अधिकृत दौऱ्यावर जाऊ शकता. तूर्तास पैशाशी संबंधित गुंतवणूक किंवा व्यवहार करणे टाळावे. जाणून घ्या मिथुन राशीच्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

  मिथुन राशीचे आजचे कौटुंबिक जीवन
  कुटुंबात काही गोंधळाची स्थिती निर्माण होऊ शकते. आज तुम्हाला प्रत्येक कामात वडिलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तसेच तुम्हाला सामाजिक कार्य करण्याची संधी मिळेल. भावंडांच्या उच्च शिक्षणासाठी पैसे गुंतवाल. सासरच्या मंडळींकडून काही शुभ वार्ता ऐकायला मिळतील. मानसिक शांतीसाठी धार्मिक कार्यातही थोडा वेळ घालवाल. तुम्हाला शिक्षकांचे सहकार्य मिळेल, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या आवडत्या विषयांचा सहज अभ्यास करू शकाल. तुम्ही तुमचे मन वडिलांशी शेअर कराल. तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी तुमच्या सकारात्मक विचारांचा आधार घ्या. मुलांमुळे तुम्हाला अभिमान वाटेल. विद्यार्थी क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन त्यात विजयी होतील. कौटुंबिक जीवन आनंदात जाईल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक डिनरवर जाल, जिथे तुम्ही एकमेकांना गोष्टी शेअर कराल

  आज तुमचे आरोग्य
  शारीरिक थकवा येण्याच्या तक्रारी दिसून येतील. विश्रांतीसाठीही थोडा वेळ काढा.

  आज नशीब 71% तुमच्या बाजूने
  आज मिथुन राशीचे लोक त्यांच्या कार्यक्षेत्रातील अनेक योजनांकडे लक्ष देतील, ज्यामध्ये अधिकारीही सहकार्य करताना दिसतील. परदेशात काम करण्याची संधी मिळू शकते. आज पैशाचे व्यवहार करणे टाळा, अन्यथा नुकसान सहन करावे लागू शकते. कौटुंबिक व्यवसाय पुढे नेण्यासाठी वडिलांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळेल. नातेवाईकांसोबतचे नातेसंबंध चांगले होतील. सामाजिक कार्य करण्याची संधीही मिळेल. आज काही खास लोकांची भेट होऊ शकते. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. प्रदोष काळात काळे तीळ मिसळलेला कच्चे तांदूळ दान करा.

  मिथुन राशीसाठी आजचे उपाय
  विष्णु सहस्त्रनामाचा पाठ करणे लाभदायक ठरेल.

  शुभ अंक – 7
  शुभ रंग – हिरवा

  (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

  इतर बातम्या

  Taurus Horoscope Today 27 February 2023 : वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल, जुने मित्र भेटतील, राशीभविष्य जाणून घ्या

   

   

  Source

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img