More
  HomeTV9MarathiINDW vs AUSW : पहिल्या टी20 सामन्यात नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने,...

  INDW vs AUSW : पहिल्या टी20 सामन्यात नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने, गोलंदाजी घेत हरमनप्रीत कौर म्हणाली…

  मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका आजपासून सुरु होत आहे. कसोटीत भारताने विजय मिळवला होता. मात्र वनडेत ऑस्ट्रेलियाने भारताला क्लिन स्विप देत व्हाईट वॉश दिला. यामुळे आता वनडेतील पराभवाचा वचपा काढण्याची संधी भारतीय महिला संघाला आहे. पहिल्या सामन्यात आता भारतीय महिला संघ कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागून आहे. भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हीने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर यामागचं कारणंही तिथे सांगितलं. “आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. आम्ही 4 सीमर आणि 2 फिरकीपटूंसह उतरणार आहोत, या संधीचा उपयोग करून प्रथम गोलंदाजी करायची आहे. आमच्यासाठी काही गोष्टी करून पाहण्याची ही योग्य संधी आहे.”, असं कर्णधार हरमनप्रीत कौर हीने सांगितलं.

  960) { googletag.cmd.push(function() { googletag.display(“desktop_top_300x250”); }); }]]>

  ऑस्ट्रे्लियन कर्णधार एलिसा हिली हीनेही आपली बाजू मांडली.”आम्हाला तसं काही टेन्शन नाही, कदाचित प्रथम गोलंदाजी करण्याचा विचार करत होतो. आमच्याकडे मजबूत फलंदाजी आहे. आमच्या खेळाडूंना खूप अनुभव आहे त्यामुळे प्रत्येकाला ते काय करत आहेत हे माहित आहे.”, असं एलिसा हिली हीने सांगितलं.

  ऑस्ट्रेलियाला आता कमी धावांवर रोखण्याचं मोठं आव्हान आता भारतीय गोलंदाजांसमोर आहे. वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांची पिसं काढली होती. हरमनप्रीत कौर हीने हाच विचार करून सहा गोलंदाज घेतले असावे.  दुसरीकडे, दुसऱ्या डावात दव मुख्य फॅक्टर ठरू शकतो. त्याचा फायदा भारतीय संघाला फलंदाजीवेळी होईल.

  960) { googletag.cmd.push(function() { googletag.display(‘desktop_medium_300x250’); }); }]]>

  दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

  ऑस्ट्रेलिया महिला (प्लेइंग इलेव्हन): एलिसा हिली (कर्णधार/विकेटकीपर), बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, एलिस पेरी, एश्ले गार्डनर, फोबी लिचफील्ड, ग्रेस हॅरिस, एनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेअरहम, मेगन शट, डार्सी ब्राउन

  भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर सिंग, तितास साधू


  Source

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img