More
    HomePoliticsJameel Shaikh Murder: जमील शेख हत्या: शूटर्सना 'त्याने' कारमधून मालेगावात सोडले आणि...

    Jameel Shaikh Murder: जमील शेख हत्या: शूटर्सना ‘त्याने’ कारमधून मालेगावात सोडले आणि…

    Jameel Shaikh Murder मनसे पदाधिकारी जमील शेख यांच्या हत्येप्रकरणी शाहिद शेख या आरोपीला अटक करण्यात आली असली तरी जमील यांच्यावर हल्ला करणारे शूटर्स अद्याप हाती लागलेले नाहीत.

    ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राबोडी प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी शाहिद लायक शेख (३१) या आरोपीला गुन्हे शाखेने (युनिट १) अटक केले असून या हत्याकांडातील आतापर्यंतची ही पहिलीच अटक आहे. शेख यांच्या हत्येनंतर शूटर्सना कारमधून मालेगावला शाहिद यानेच सोडले होते. ही कार तो टुरिस्टसाठी वापरत असून कारही त्याचीच असल्याची माहिती अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) संजय येनपुरे यांनी ‘मटा’शी बोलताना दिली. शूटर्सचा शोध सुरू असून जोपर्यंत शूटर पकडले जाणार नाहीत तोपर्यंत हत्याकांडामागच्या कारणाचा उलगडा होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. )

    जमील शेख

    मोटारसायकलवरून निघालेल्या जमील शेख यांची सोमवारी दुपारी मारेकऱ्यांनी गोळी झाडून हत्या केली होती. राबोडीत भरवस्तीत ही थरारक घटना घडली होती. मोटारसायकलवरील मारेकऱ्यांनी जमील यांच्या डोक्याच्या मागे गोळी झाडल्याने रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट एककडून करण्यात येत असून मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी गुन्हे शाखेची तीन पथके दिवसरात्र प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांमध्ये पहिले यश मिळाले असून राबोडीमधून शाहिद शेख याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. या गुन्ह्यात मारेकऱ्यांसह त्याचाही सक्रीय सहभाग असल्याची बाब चौकशीमध्ये निष्पन्न झाली आहे. न्यायालयाने त्याला ३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. चालक असलेला शाहिद हा जमील यांना ओळखत असल्याचे समजते.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img