More
  HomeEntertainmentKBC मध्ये 1 कोटी रुपये जिंकल्यास द्यावा लागतो लाखोंचा कर; विजेत्यांना मिळतात...

  KBC मध्ये 1 कोटी रुपये जिंकल्यास द्यावा लागतो लाखोंचा कर; विजेत्यांना मिळतात…

  KBC अर्थात ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाबाबत अनेकांनाच कुतूहल वाटतं. सूत्रसंचालकाच्या रुपात दिसणारे बिग बी अमिताभ बच्चन, कार्यक्रमाची लोकप्रियता आणि त्याहूनही या कार्यक्रमातील विजेत्यांच्या नावे दिली जाणारी रक्कम ही यामागची मुख्य कारणं. एकदा तरी, बिग बींसमोर असणाऱ्या त्या ‘हॉट सीट’वर बसत ‘केबीसी’मध्ये सहभागी होण्याचं आणि जास्तीत जास्त रक्कम जिंकण्याचं अनेकांचंच स्वप्न.

  पण, तुम्हाला माहितीये का; ‘केबीसी’मध्ये एक कोटी रुपयांचं बक्षीस जिंकणाऱ्या विजेत्या किंवा विजेतीला ही पूर्ण रक्कम मिळत नाही. जिंकलेल्या रकमेपैकी बराच भाग हा त्यांना कर स्वरुपात जमा करावा लागतो.

  कर म्हणून भरावे लागतात लाखो रुपये

  एबीबी live हिंदीच्या वृत्तानुसारअसं म्हटलं जातं की,  TDS टीडीएस अंडर सेक्शन 194 बी नुसार जर कोणी स्पर्धक 1 कोटी रुपयांची रक्कम बक्षीस स्वरुपात जिंकतो तर, त्याववर त्यानं 30 टक्के म्हणजेच 30 लाख रुपयांचा कर भरणं अपेक्षित असतं. यासोबतच 30 लाख रुपयांच्या करावर 10 टक्के सरचार्जही देण्यात येतो. ज्याची रक्कम 3 लाख इतकी आहे. 30 लाख रुपयांच्या रकमेवर 4 टक्के सेस म्हणजेच 1.2 लाख रुपयेही आकारले जातात. परिणामी 1 कोटी रुपयांच्या रकमेवर कर लागल्यामुळं विजेत्याला 34.2 लाख रुपये कर स्वरुपात द्यावे लागतात. इतकी रक्कम कर स्वरुपात दिल्यानंतर विजेत्यांच्या हाती फक्त 65 लाख रुपयेच उरतात.

  आकडेवारी भुवया उंचावणारी असल्यामुळं ‘कौन बनेगा करोडपती’चा विजेता बक्षीस स्वरुपात मात्र करोडपती होत नाही हीच बाब समोर येत आहे. असं असलं तरीही या मंचावर आल्यानंतर त्यांच्या वाट्याला येणारे क्षण आणि अनुभव यांचंही महत्त्वं तितकंच आहे, ही बाबाही नाकारता येत नाही.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img