More
    HomeCoronaLIVE: एकही प्रवासी थेट घरी सोडणार नाही, सक्तीने क्वारंटाईन करणार : आयुक्त...

    LIVE: एकही प्रवासी थेट घरी सोडणार नाही, सक्तीने क्वारंटाईन करणार : आयुक्त चहल

    • महाराष्ट्रात उद्यापासून रात्रीची संचारबंदी, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णयब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली. राज्यात उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहा पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ५ जानेवारीपर्यंत ते लागू राहील. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील १५ दिवस अधिक सतर्क रहावे लागेल, असे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img