नांदेड : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. केंद्र आणि राज्य सरकारवर मराठा समाजाचा रोष व्यक्त होत असून आता विविध प्रकारच्या आंदोलनासह मतदानावर बहिष्कार टाकणे सुरू आहे. आता नांदेड जिल्ह्यातील सुगाव बु.येथील मराठा समाजाने ग्रामपंचायत निवडणूकीसह येणाऱ्या सर्व निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला आहे. असे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. मराठा समाजाला शासनाने दिलेल्या एसईबीसी आरक्षणानुसार अनेक मुलांना नौकरीचे कॉल आले आहेत, पण सुप्रिम कोर्टाच्या स्थगितीमुळे ज्वाईन करून घेतले जात नाही. मुलांची मनस्थीती बिघडत आहे तसेच आरक्षणाच्या मुद्द्यावर आमच्या शेकडो मराठा समाजाला आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली तरी अद्याप आम्हाला आरक्षण देण्यात आले नाही. उलट सर्व पक्षीयांकडुन राजकारणच केले जात असल्याचा आरोप मराठा समाजाने केलाय
Read more –