काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं चित्र आहे. आघाडी धर्म पाळावा, असं ट्वीट राज्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं आहे. “महाविकास आघाडीतील सहकारी पक्षांना आवाहन करते की महाराष्ट्रात स्थिर सरकार हवं असल्याच काँग्रेसच्या नेतृत्त्वावर भाष्य करणं टाळा. प्रत्येकाने आघाडी धर्म पाळायला हवा, असं यशोमती ठाकूर यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
Read more