More
  HomeEntertainmentMS धोनी नव्या भूमिकेत; या चित्रपटात करणार मुख्य रोल

  MS धोनी नव्या भूमिकेत; या चित्रपटात करणार मुख्य रोल

  भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनी लवकरच चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता तो फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसेल.

  रांची: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेणारा भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आता मनोरंजन क्षेत्रात येणार आहे. धोनीने १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतील होती. त्यानंतर तो आयपीएलच्या १३व्या हंगामात खेळला. आता धोनी चित्रपटातून अभिनय करताना दिसणार आहे.

  धोनी

  धोनी स्वत:च्या प्रोडक्शन हाऊस धोनी एंटरटेनमेंटद्वारे अघोरी या चित्रपट/वेब सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी धोनीची पत्नी साक्षी धोनीने सोशल मीडियावर यासंदर्भात माहिती दिली होती.

  या चित्रपटातील अन्य कलाकारांची अद्याप निवड झाली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाचा विषय सायन्स फिक्शन असणार आहे. एका बेटावर काही जण अडकले आहेत अशी चित्रपटाची कथा असेल. ज्या लेखकाने याची कथा लिहली आहे ती त्याची पहिली स्टोरी आहे. धोनीच्या कंपनीने याआधी रोर ऑफ द लायन या डॉक्यूमेंट्रीची निर्मिती केली होती.
  धोनीच्या आधी भारताच्या अनेक क्रिकेटपटूंनी चित्रपटात काम केले आहे. यात संदीप पाटील, विनोद कांबळी, सचिन तेंडुलकर, एस श्रीसंत, अजय जडेजा, सलील अंकोला यांचा समावेश आहे.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img