कल्याण माणिकराव देशमुख, Tv9 मराठी |
Updated on: Mar 21, 2023 | 8:27 AM
Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलात मोठा फेरबदल सुरु आहे. या अपडाऊनमध्ये जनतेला मात्र कोणतीही झळ बसलेली नाही. गेल्या वर्षभरापासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणताही दखल घेण्याजोगा बदल झालेला नाही.
आजचा भाव काय
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलात मोठा फेरबदल सुरु आहे. कधी किंमती दोन डॉलरने वाढतात. तर त्याच झपाट्याने कमी होत आहे. पण गेल्या तीन महिन्यांपासून या किंमती 80 डॉलरच्या आतच असल्याने तेल विपणन कंपन्यांनाचा फायदा झाला आहे. तेल विपणन कंपन्यांना हे वर्ष लक्की ठरलं आहे! 21 मार्च रोजी डब्ल्यूटीआई क्रूड ऑईलमध्ये (WTI Crude Oil) 67.29 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. तर ब्रेंट क्रूड ऑईलचा (Brent Crude Oil) आजचा भाव 73.36 डॉलर प्रति बॅरल आहे. या अपडाऊनमध्ये जनतेला मात्र कोणतीही झळ बसलेली नाही. गेल्या वर्षभरापासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol-Diesel Price) कोणताही दखल घेण्याजोगा बदल झालेला नाही. तेल कंपन्यांनी सकाळी 6 वाजता इंधनाचे दर अपडेट केले आहे.
Source