More
  HomeTV9MarathiRam Mandir : कराडच्या छायाचित्रकाराची कलाकृती लागणार राम मंदिरात

  Ram Mandir : कराडच्या छायाचित्रकाराची कलाकृती लागणार राम मंदिरात

  सातारा :  अयोध्येत राम मंदिराचे (Ram Mandir) निर्माण कार्य सुरू आहे. या मंदिरात 22 जानेवारीला रामललाचा अभिषेक आणि प्राण प्रतिष्ठापणा होणार आहे. समाजातले अनेक घटक आपापल्यापरिने मंदिर निर्माणासाठी योगदान देत आहे. कोणी मंदिरासाठीभव्य घंटा दिली तर कोणी अगरबत्ती दिली. असेच एक योगदान साताऱ्याच्या एका कलाकारानेसुद्धा केले आहे. अयोध्येमध्ये राम जन्मभूमीत रामलल्ला विराजमान होत आहेत. भव्य राममंदिर साकार होत असताना त्यामध्ये सातारा  कराडमधील छायाचित्रकार कल्पेश पाटसकर यांनी काढलेले फोटोरूपी रामचरित्र अयोध्येत कायमस्वरुपी लावण्यात येणार आहे. ही सर्व छायाचित्रे श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण प्रकल्प प्रमुख गोपालजी यांच्याकडे केदार गाडगीळ आणि कल्पेश पाटसकर यांनी अयोध्या येथे सुपूर्द केली आहेत.

  960) { googletag.cmd.push(function() { googletag.display(“desktop_top_300x250”); }); }]]>

  श्रीरामांच्या आदर्श गुणांचे  पंधरा फोटो

  हे छायाचित्र शहरातील कलाकारांच्या सहभागातून टिपले असुन त्याची दिनदर्शिका केली आहे या दिनदर्शिकेतील फोटो अयोध्येत कायमस्वरूपी लावले जाणार असल्यामुळे कराडकरांचा हा एक अनोखा सम्मानच आहे.

  आमचे दोन्ही उद्देश सफल झाले असुन  आम्ही शुट केलेले दिनदर्शिकेतील फोटो अयोध्येमधील श्रीराम न्यास कार्यालयात  कायमस्वरुपी लावण्यात येणार यामुळे आमच्या कलेचे चीज झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.  या फोटो दिनदर्शिका विक्रीमधुन आलेल्या दोन लाख रुपये श्रद्धा मुल्य मंदिर निर्माणासाठी देणगी दिली असल्याचे  फोटोग्राफर कल्पेश पाटसकर यांनी सांगितले.

  960) { googletag.cmd.push(function() { googletag.display(‘desktop_medium_300x250’); }); }]]>

  हे सुद्धा वाचा

  मंदिरात रामललाचे दर्शन घेण्यापूर्वी भाविकांना पवनपुत्राचे दर्शन

  गोस्वामी तुलसीदासांनी हनुमान चालिसामध्ये लिहिले आहे, राम दुआरे तुम रखवारे, होत न आज्ञा बिनु पैसारे  म्हणजेच जेव्हा एखादा भक्त रामललाच्या दर्शनासाठी धार्मिक नगरी अयोध्येत येतो तेव्हा त्याला प्रथम हनुमानजींचे दर्शन घ्यावे लागते. त्यांच्या परवानगीनंतरच भाविकांना रामललाचे दर्शन मिळते. कदाचित त्यामुळेच आता रामललाचे प्रथम सेवक हनुमानजींचीही मंदिरात स्थापना होणार आहे. तीर्थ क्षेत्र ट्रस्ट राम मंदिराच्या प्रवेशद्वारावर हनुमानजींची मूर्ती बसवण्याची तयारी करत आहे.


  Source

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img