More
  HomeTV9MarathiRam Mandir : 22 जानेवारीला या राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर, ड्राय डेची...

  Ram Mandir : 22 जानेवारीला या राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर, ड्राय डेची ही घोषणा

  अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते 22 जानेवारीला अयोध्येत होणार्‍या रामलल्लाचं प्राणप्रतिष्ठा होणार आहे. संपूर्ण देशात यासाठी उत्साह दिसून येत आहे. जगभरातील भारतीय लोकं याची वाट पाहत आहे. कारण शेकडो वर्षानंतर राम मंदिर बनत आहे. यानिमित्ताने योगी सरकार या कार्यक्रमासाठी कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. संपूर्ण जगाच्या नजरा अयोध्येवर असतील. या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात हजारो व्हीव्हीआयपी शहरात येणार आहेत. करोडो रामभक्त हा कार्यक्रम टीव्ही चॅनेल्सवर पाहतील. यासंदर्भात राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. योगी सरकारने 22 जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

  960) { googletag.cmd.push(function() { googletag.display(“desktop_top_300x250”); }); }]]>

  22 जानेवारीला राज्यात ड्राय डे

  उत्तर प्रदेशात या संपूर्ण राज्यातील दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश सरकारने जारी केले आहेत. उत्पादन शुल्क विभागाने राज्यातील सर्व उत्पादन शुल्क आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांना पत्र लिहून 22 जानेवारी रोजी सर्व दारूविक्री बंद ठेवावी, असे म्हटले आहे. राज्याच्या उत्पादन शुल्क आयुक्तांनी लिहिलेल्या पत्रात 22 जानेवारीला अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व दारूची दुकाने बंद राहणार आहेत.

  अयोध्येत मोठा पोलीस बंदोबस्त

  या कार्यक्रमाच्या सुरक्षेसाठी प्रत्येक कानाकोपऱ्यात उत्तर प्रदेश पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. अयोध्येला छावणीचे स्वरुप आले आहे. यूपी पोलिसांचे विशेष डीजी (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी माहिती दिली की, यूपी पोलिसांनी या कार्यक्रमासाठी विशेष तयारी केली आहे. अयोध्येकडे जाणारे सर्व रस्ते सुरक्षित केले जात आहेत. याठिकाणी कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही याचीही काळजी घेतली जात आहे. रस्त्यांवर ठराविक अंतराने पेट्रोलिंग करण्यात येत आहे.

  960) { googletag.cmd.push(function() { googletag.display(‘desktop_medium_300x250’); }); }]]>

  अयोध्येच्या प्रत्येक कानाकोपऱ्यावर पोलिसांची नजर

  प्रशांत कुमार यांनी सांगितले की, अयोध्येच्या प्रत्येक कानाकोपऱ्यावर नजर ठेवण्यात येत आहे. अयोध्या जिल्ह्यात 10 हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत. यासोबतच अयोध्या शहरात अनेक आधुनिक साधनसामग्री बसवली जात असून त्यामुळे पोलीस आणि सुरक्षा जवानांना मदत होणार आहे.


  Source

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img