मुंबई : राज्यात महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर आंध्रप्रदेशच्या दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘शक्ती कायदा’ येणार आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महिला व बाल अत्याचाराच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी शक्ती कायद्याचा मसुदा मंजूर होण्याची शक्यता आहे. महिला अत्याचार प्रकरणात 21 दिवसात निकाल लागावा तसेच महिला व बाल अत्याचारांच्या घटनांमधील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी हा कायदा असणार आहे. आज कॅबिनेटमध्ये शक्ती कायद्याचा मसुदा मंजुरीसाठी येण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात सरकार कायदा आणण्याच्या तयारीत आहे.
Read more –