More
  HomeTV9MarathiSharad Mohol | पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळचं भाजपाशी काय होत कनेक्शन?

  Sharad Mohol | पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळचं भाजपाशी काय होत कनेक्शन?

  पुणे : पुण्यामध्ये भर दिवसा झालेल्या गोळीबारामध्ये कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याचा खून करण्यात आला आहे. कोथरूड परिसरातील सुतारदरामध्ये दुचाकीवर आलेल्या अज्ञातांनी त्याला गोळ्या घातल्या. सुरूवातीला शरद मोहोळ याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. शरद मोहोळ याच्या मृत्यूने पुणे हादरलं असून परत एकदा टोळी युद्धाचा भडका उडणार का? हे पाहणं महत्त्वाचा ठरणार आहे. शरद मोहोळ याचा त्याच्याच परिसरात घुसून नेमका कोणी गेम केला? पोलीस याचा तपास करत आहेत. शरद मोहोळ याचं भाजपासोबत कनेक्शन काय होतं ते जाणून घ्या.

  960) { googletag.cmd.push(function() { googletag.display(“desktop_top_300x250”); }); }]]>

  शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यानी भाजपमध्ये प्रवेश केला होता. स्वाती मोहोळ यांनी पक्षप्रवेश केला तेव्हा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील, शहाराध्यक्ष जगदीश मुळीक आणि प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. शरद मोहोळ याच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केल्यावर अनेकांनी जोरदार टीका केली होती.

  960) { googletag.cmd.push(function() { googletag.display(‘desktop_medium_300x250’); }); }]]>

  कोथरूड परिसरामध्ये शरद मोहोळ टोळीचं वर्चस्व होतं. याचाच फायदा भाजपला निवडणुकीसाठी होणार होता. मात्र कुख्यात गुंडाला भाजपमध्ये घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात टीका झालेली पाहायला मिळाली होती. निवडणुकांआधीच शरद मोहोळ याचा नेमका कोणी गेम वाजवला? हा खून टोळीयुद्धातून झाला की दुसऱ्याच व्यक्तीने त्याला संपवलं याचा तपास पोलीस करत आहेत.

  दरम्यान, संदीप मोहोळ याचा 2006 साली खून झाल्यावर त्याच्या जागी शरद मोहोळ टोळीच्या म्होरक्या झाला होता. शरद मोहोळ याच्यावर खून, खंडणी, खुनाचा प्रयत्न असे अने गंभीर गुन्हे आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमध्येही त्याच्या नावावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे.


  Source

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img