मुंबई : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना (Team India Suresh Raina) अडचणीत सापडला आहे. मुंबई पोलिसांनी सुरेश रैनावर एफआयआर (Mumbai Police FIR) दाखल केला आहे. मुंबई एका पबमध्ये कोरोना नियमाचं उल्लंघन केल्या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. Mumbai Police files FIR against former Team India player for violating Corona rules
मुंबईतील एअरपोर्टनजीक ड्रॅग्न फ्लाई पबमध्ये एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीमध्ये अनेकांनी कोरोना नियमांचं उल्लंघन केलं होतं. या पार्टीत अनेकांनी सोशल डिस्टंसच्या नियमाला पायदळी तुडवले. तसेच या पार्टीत उपस्थित असलेल्यांनी मास्कही लावला नव्हता. पोलिसांना सर्व प्रकाराची माहिती मिळताच रात्री साडे तीनच्या दरम्यान या पबवर छापा टाकला. या पब पार्टीत गायक गुरु रंधवा आणि इतर सेलेब्रिटीही उपस्थित होते. कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे सुरेश रैनासह या पब मालकावरही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी रैनावर आयपीसीच्या कलम 188, 269 आणि 34 नुसार कारवाई करण्यात आली आहे.