More
  HomeTV9MarathiTeam India | इंग्लंड-ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, कॅप्टन कोण?

  Team India | इंग्लंड-ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, कॅप्टन कोण?

  मुंबई | मेन्स क्रिकेट टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथ्या टी 20 सामन्यात विजय मिळवत मालिकाही जिंकली. टीम इंडियाने 5 सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी आघाडी घेतली. या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना हा रविवारी 3 डिसेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात अनु्क्रमे टी 20, वनडे आणि टेस्ट सीरिज खेळणार आहे. या दरम्यान बीसीसीआयने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.

  960) { googletag.cmd.push(function() { googletag.display(“desktop_top_300x250”); }); }]]>

  डिसेंबर महिन्यात वूमन्स इंग्लंड आणि त्यानंतर वूमन्स ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर येणार आहे. वूमन्स इंग्लंड टीम इंडिया विरुद्ध 3 टी 20 सामन्यांची मालिका आणि 1 कसोटी सामना खेळणार आहे. तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध 1 कसोटी, 3 वनडे आणि 3 टी 20 आय सामन्यांची मालिका होणार आहे. या दोन्ही संघाविरुद्धच्या मालिकांसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. तर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे आणि टी 20 सीरिजसाठी काही दिवसांनी भारतीय संघ जाहीर करण्यात येणार आहे.

  हरमनप्रीत कौर कॅप्टन

  इंग्लंड विरुद्धच्या टी 20, कसोटी आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत हरमनप्रीत कौर टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर सांगलीकर स्मृती मंधाना हीच्याकडे उपकर्णधारपद देण्यात आलं आहे.

  960) { googletag.cmd.push(function() { googletag.display(‘desktop_medium_300x250’); }); }]]>

  इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया

  हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, वाय भाटिया (विकेटकीपर), रिचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, श्रेयंका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक, रेणुका ठाकुर, तितास साधू , पूजा वस्त्राकर, कनिका आहुजा आणि मिन्नू मणी.

  इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया | हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना (उपकर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), रिचा घोष (विकेटकीपर), स्नेह राणा, शुभा सतीश, हरलीन देओल, सायका इशाक, रेणुका ठाकुर, तितास साधू , मेघना सिंग, राजेश्वरी गायकवाड आणि पूजा वस्त्राकार.

  टीम इंडिया-इंग्लंड टी 20 मालिका

  पहिला सामना, 6 डिसेंबर, संध्याकाळी 7 वाजता

  दुसरा सामना, 9 डिसेंबर, संध्याकाळी 7 वाजता

  तिसरा सामना, 10 डिसेंबर, संध्याकाळी 7 वाजता

  एकमेव कसोटी सामना, 14 ते 17 डिसेंबर, सकाळी साडे नऊ वाजता.

  ऑस्ट्लियाचा भारत दौरा

  एकमेव टेस्ट, 21 ते 24 डिसेंबर, सकाळी साडे नऊ वाजता.

  वनडे सीरिज

  पहिला सामना, 28 डिसेंबर, दुपारी दीड वाजता.

  दुसरा सामना, 30 डिसेंबर, दुपारी दीड वाजता.

  तिसरा सामना, 2 जानेवारी, दुपारी दीड वाजता.

  तिन्ही सामने मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये पार पडतील.

  टी 20 सीरिज

  पहिला सामना, 5 जानेवारी,

  दुसरा सामना, 7 जानेवारी,

  तिसरा सामना, 9 जानेवारी,

  तिन्ही सामने नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडिममध्ये होतील.


  Source

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img