More
  HomePoliticsUrmila Matondkar Shivsena | अभिनेत्री उर्मिला मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता

  Urmila Matondkar Shivsena | अभिनेत्री उर्मिला मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता

  मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उद्या (30 नोव्हेंबर) शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या खात्रीलायक सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी उर्मिला मातोंडकर यांनी विधानपरिषदेतील राज्यपाल नामनिर्देशित जागेसंदर्भात शिवसेनेच्या प्रस्तावाला होकार दिल्याची माहिती समोर येत होती. त्यानंतर आता त्या थेट शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. (Bollywood Actress Urmila Matondkar Will Join Shivsena Tomorrow)

  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्मिला मातोंडकर यांचा उद्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उर्मिला मातोंडकरांचा पक्षप्रवेश होईल, असे सांगितले जात आहे. दरम्यान शिवसेनेकडून किंवा उर्मिला मातोंडकरांकडून काही माहिती देण्यात आली आहे.

  काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली होती. अभिनेत्री कंगना रानौतने बॉलीवूड कनेक्शनच्या मुद्द्यावरुन आदित्य ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष्य केले असताना उर्मिला मातोंडकर यांनी सर्वप्रथम तिच्या टीकेला प्रत्युत्तर दिले होते. याशिवाय, उर्मिला मातोंडकर यांचे वक्तृत्त्व, राजकीय समज आणि राज्यपालनियुक्त सदस्यपदासाठीचे निकष पूर्ण करण्याची क्षमता लक्षात घेऊन शिवसेना त्यांना विधानपरिषेदवर पाठवल्याचं म्हटलं आहे.

  read more-

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img