More
  HomeTV9MarathiVasant Panchami : या वर्षी किती तारखेला साजरी होणार वसंत पंचमी? जाणून...

  Vasant Panchami : या वर्षी किती तारखेला साजरी होणार वसंत पंचमी? जाणून घ्या सरस्वती पूजनाचा मुहूर्त आणि विधी

  मुंबई : कॅलेंडरनुसार, वसंत पंचमी (Vasant Panchami 2024) हा सण दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला साजरा केला जातो. हा सण प्रामुख्याने ज्ञान, विद्या, संगीत आणि कलेची देवी माता सरस्वती यांना समर्पित आहे. या दिवशी देवी सरस्वतीचा जन्म झाला अशी धार्मिक मान्यता आहे. असे मानले जाते की वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वती पांढऱ्या कमळावर पुस्तक, वीणा आणि हार घेऊन विराजमान झाल्या होत्या, म्हणून या दिवशी माता सरस्वतीची विशेष पूजा केली जाते. तसेच वसंत पंचमीपासून वसंत ऋतु सुरू होतो. शास्त्रानुसार वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची पूजा केल्याने माता लक्ष्मी आणि देवी कालीही प्रसन्न होतात. अशा परिस्थितीत 2024 सालातील सरस्वती पूजेची तारीख म्हणजेच वसंत पंचमी, पूजेची वेळ आणि पूर्ण पूजा पद्धती जाणून घेऊया.

  960) { googletag.cmd.push(function() { googletag.display(“desktop_top_300x250”); }); }]]>

  वसंत पंचमी तारीख 2024

  पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी १३ फेब्रुवारीला दुपारी २:४१ वाजता सुरू होत आहे. दुसऱ्या दिवशी 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:09 वाजता संपेल. 14 जानेवारीला उदया तिथी येत असल्याने यंदा वसंत पंचमीचा सण 14 फेब्रुवारीला साजरा केला जाणार आहे.

  वसंत पंचमी 2024 रोजी पूजेसाठी शुभ मुहूर्त

  14 फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी 7.01 ते दुपारी 12.35 पर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त असेल. अशा स्थितीत या दिवशी पूजेसाठी तुमच्याकडे जवळपास 5 तास 35 मिनिटे वेळ आहे.

  960) { googletag.cmd.push(function() { googletag.display(‘desktop_medium_300x250’); }); }]]>

  हे सुद्धा वाचा

  वसंत पंचमीची पूजा पद्धत

  • वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर पिवळे किंवा पांढरे रंगाचे कपडे घाला. त्यानंतर सरस्वतीची पूजा करण्याची प्रतिज्ञा घ्या.
  • पूजेच्या ठिकाणी माता सरस्वतीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा. माता सरस्वतीला गंगाजलाने स्नान घालावे. मग त्यांना पिवळे कपडे घाला.
  • यानंतर पिवळी फुले, अक्षत, पांढरे चंदन किंवा पिवळ्या रंगाची रोळी, पिवळा गुलाल, धूप, दिवा, सुगंध इत्यादी अर्पण करा.
  • या दिवशी देवी सरस्वतीला झेंडूच्या फुलांनी हार घाला. तसेच पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी.
  • यानंतर सरस्वती वंदना आणि मंत्राने देवी सरस्वतीची पूजा करावी.
  • तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पूजेच्या वेळी सरस्वती कवचही पाठ करू शकता.
  • शेवटी हवन कुंड बनवा, हवन साहित्य तयार करा आणि ‘ओम श्री सरस्वत्याय नम: स्वाहा’ या मंत्राचा जप करून हवन करा.
  • नंतर शेवटी उभे राहून माता सरस्वतीची आरती करावी.

  (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)


  Source

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img