More
  HomeTV9MarathiWeight Loss: केवळ आहारात बदल नको, वजन कमी करण्यासाठी 'या' 3 गोष्टींची...

  Weight Loss: केवळ आहारात बदल नको, वजन कमी करण्यासाठी ‘या’ 3 गोष्टींची घ्या काळजी

  आजकाल अनेक लोक वाढते वजन अथवा लठ्ठपणामुळे त्रस्त आहे. वजनावर नियंत्रण ठेवायचे असेल तर आहारात बदल करण्यासह काही गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

  नवी दिल्ली – वाढते वजन किंवा लठ्ठपणा (weight gain) ही सध्याच्या काळातील एक गंभीर समस्या बनली आहे. एका आकडेवारीनुसार जगातील सुमारे 13 टक्के लोकसंख्या लठ्ठपणाच्या (obesity) समस्येला बळी पडली आहे. लठ्ठपणा हे आरोग्याच्या गंभीर समस्यांचे कारण आहे, असे काही अभ्यासांमध्ये नोंदवले गेले आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह, हृदयरोग यांसारख्या गंभीर आजारांचा (diseases) धोका लक्षणीयरीत्या वाढतो. म्हणूनच सर्व वयोगटातील लोकांनी वजन नियंत्रणात ठेवावे असा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. लहान मुलांमधील वाढत्या वाढत्या लठ्ठपणाची समस्या आणखी गंभीर होऊ शकते, त्याकडे पालकांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे, असेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

  960) { googletag.cmd.push(function() { googletag.display(“desktop_top_300x250”); }); }]]>

  वजन वाढण्याची अनेक कारणे असू शकतात. ती वेळेत ओळखून त्यापासून बचाव करण्याच्या उपायांचा अवलंब करावा. वजन कमी करण्यासाठी लोक अनेक प्रकारचे प्रयोग करतात. इंटरमिटेंट फास्टिंग असो वा आहारात बदल किंवा डाएट करणे, असे अनेक उपाय ते करतात. मात्र केवळ आहारात बदल करून वाढत्या वजनावरं नियंत्रण मिळवणे शक्य नसते. त्यासाठी रोजच्या दिनचर्येत काही गोष्टींचा अंतर्भाव करणेही आवश्यत असते.

  वजन का वाढते ?

  जास्त प्रमाणात खाणे आणि खूप कमी चालणे किंवा शारीरिक हालचाल न करणे, हे घटक लठ्ठपणासाठी कारणीभूत ठरू शकतात, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. जास्त कॅलरज, फॅट्स असलेले पदार्थ तसेच गोड पदार्थ यांचे अधिक सेवन केले आणि तुमचा व्यायाम अथवा शारीरिक हालचाली अतिशय कमी असतील तर अतिरिक्त उर्जा ही शरीरातील फॅटच्या रुपात वाढते. त्यामुळे लठ्ठपणा येऊ शकतो.

  लठ्ठपणाची समस्या टाळायची असेल तर आहारात बदल करण्यासह काही गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

  नियमित व्यायाम करावा

  वजन कमी करण्यासाठी योग्य आहारासोबतच नियमित व्यायाम करणेही तितकंच गरजेचं आहे. जेवणातून मिळणाऱ्या कॅलरीज जाळण्यासाठी व्यायाम करणं अत्यंत आवश्यक मानलं जातं. प्रत्येक व्यक्तीने आठवडाभरात कमीत कमी 150 मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे. तुम्हाला जिममध्ये जाणे शक्य नसेल तर चालणे, धावणे, सायकलिंग असे व्यायाम करूनही फायदा होऊ शकतो. ही सवय वजन कमी करण्यासाठी तसेच जीवनशैलीशी संबंधित इतर अनेक आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करते.

  शरीर हायड्रेटेड ठेवा

  वाढलेले अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी शरीर हायड्रेटेड ठेवणे खूप महत्वाचे मानले जाते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने दररोज 3 ते 4 लिटर पाणी प्यायले पाहिजे. पाणी प्यायल्याने आपली पचनक्रिया व्यवस्थित राहते आणि शरीरातील टॉक्सिन्स कमी होतात. अतिरिक्त चरबी तयार होण्यापासून रोखण्यासाठी देखील पाणी उपयुक्त ठरते. पुरेसे पाणी प्यायल्याने पचनसंस्था निरोगी राहते, ज्यामुळे शरीरात आवश्यक पोषक द्रव्यांचे शोषण देखील सुधारते.

  पुरेशी झोप घेणे गरजेचे

  पुरेशा प्रमाणात झोप घेतल्याने आपल्याला वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत मदत करते, असे बऱ्याच अभ्यासातून सिद्ध झाले आहे. झोपेची कमतरता हे वजन वाढण्याचे कारण असू शकते. त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो. रात्री लवकर झोपण्याची व सकाळी लवकर उठण्याची सवय अंगिकारली पाहिजे, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. रात्री उशीरा झोपल्याने आपली साखरेची क्रेव्हिंग वाढते, ज्यामुळे शरीरातील कॅलरीज वाढण्याचा धोका वाढतो. पुरेशी आणि वेळेवर झोप ही तुम्हाला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते.

  960) { googletag.cmd.push(function() { googletag.display(‘desktop_medium_300x250’); }); }]]>

  हे सुद्धा वाचा

  (टीप- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)


  Source

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img