More
  HomeTV9MarathiWTC 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारत कसा पोहोचणार! टीम...

  WTC 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारत कसा पोहोचणार! टीम इंडियाला अजून किती संधी? जाणून घ्या

  WTC 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडिया तिसऱ्यांदा धडक मारणार! कसं ते समजून घ्या

  मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमुळे प्रत्येक कसोटी सामना आणि मालिकेला महत्त्वा प्राप्त झालं आहे. कसोटी चॅम्पियनशिपच्या शर्यतीत 9 संघ असून आतापासूनच चुरस निर्माण झाली आहे. विजयी टक्केवारी अंतिम फेरीचं गणित अवलंबून आहे. भारत कसोटी चक्रातील दुसरी मालिका खेळत आहे. यापूर्वी वेस्ट इंडिज विरुद्ध मालिका 1-0 ने जिंकली होती. मालिकेतील एक सामना ड्रॉ झाल्याने विजयी टक्केवारीवर परिणाम झाला होता. त्यानंतर दक्षिण अफ्रिकेविरुद्ध एक डाव आणि 32 धावांनी पराभव झाला. त्यामुळे विजयी टक्केवारीवर परिणाम झाला आहे. तसेच एकाच पराभवामुळे पहिल्या स्थानावर थेट सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. त्यामुळे टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची रेस हवी तितकी सोपी नाही. त्यामुळे या पुढे होणाऱ्या मालिकेतील प्रत्येक सामन्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. इतकंच काय तर पेनल्टी लागू नये याची काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा पेनल्टीच्या रुपाने विजयी टक्केवारीतील गुण उणे केले जातील. भारत आणि दक्षिण अफ्रिका मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना उरला आहे. हा सामना भारताने जिंकल्यास गुणांकनात फरक पडेल. तसेच दुसऱ्या स्थानी झेप घेता येईल. पण हा सामना गमावला तर थेट सातव्या किंवा आठव्या स्थानी घसरण होईल.

  960) { googletag.cmd.push(function() { googletag.display(“desktop_top_300x250”); }); }]]>

  भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशनशिपच्या अंतिम फेरीपर्यंत अजून चार मालिका खेळणार आहे. यात इंग्लंड, बांगलादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांचा समावेश आहे. यापैकी तीन मालिका भारतात होणार आहेत. तर एक मालिका ऑस्ट्रेलियात खेळली जाणार आहे. जानेवारी-मार्च 2024 दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका आहे. सप्टेंबर 2024 मध्ये बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका, ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका भारतात खेळली जाणार आहे. तर नोव्हेंबर डिसेंबर 2024 दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका ऑस्ट्रेलियात खेळली जाणार आहे.

  960) { googletag.cmd.push(function() { googletag.display(‘desktop_medium_300x250’); }); }]]>

  भारताने दोन वेळा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. पहिल्यांदा न्यूझीलंड आणि दुसऱ्या ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. न्यूझीलंडने 8 गडी राखून भारताचा पराभव केला होता. तर दुसऱ्या पर्वात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 धावांनी पराभव केला होता. त्यामुळे दोन वेळेस भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलं होतं. आता तिसऱ्यांदा पुन्हा एकदा भारत अंतिम फेरी गाठतो का? हा प्रश्न आहे.


  Source

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img