More
    More
      HomeTV9MarathiRam Mandir | मोदी सरकारच्या हाफ डे सुट्टीच्या निर्णयावर असदुद्दीन ओवैसींच मोठ...

      Ram Mandir | मोदी सरकारच्या हाफ डे सुट्टीच्या निर्णयावर असदुद्दीन ओवैसींच मोठ वक्तव्य, म्हणाले, हे तर….

      Ram Mandir | केंद्र सरकारने येत्या 22 जानेवारीला अर्धा दिवस सुट्टीची घोषणा केली आहे. अयोध्येत राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा असल्याने ही घोषणा करण्यात आली आहे. आता AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी या निर्णयावर टिप्पणी केली आहे. केंद्र सरकारने संपूर्ण देशात त्यांच्या अखत्यारित येणारी केंद्र सरकारची कार्यालय, संस्था आणि औद्योगिक प्रतिष्ठान यांच्यासाठी अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केलीय. सध्या देश राममय झाला आहे. सगळ्या देशाला 22 जानेवारीचा प्रतिक्षा आहे. या दिवशी रामललाची प्राण प्रतिष्ठा होईल. बऱ्याचवर्षापासून कोट्यवधी लोक या क्षणाची प्रतिक्षा करत होते. केंद्राने म्हणूनच अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केलीय. पण त्यावरुन आता राजकारण सुरु झालं आहे.

      960) { googletag.cmd.push(function() { googletag.display(“desktop_top_300x250”); }); }]]>

      AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्राचा हा निर्णय बहुमताच तुष्टीकरण असल्याच ओवैसींनी म्हटलं आहे. ईद मिलाद उन नबीच्या वेळी सुट्टीची तरतूद होती. पण भाजपाशासित राज्य सरकारांनी ती तरतूद रद्द केली. एका संवैधानिक प्राधिकरणाने नमाज पठणासाठीचा शुक्रवारचा 30 मिनिटांचा ब्रेक संपवला.

      960) { googletag.cmd.push(function() { googletag.display(‘desktop_medium_300x250’); }); }]]>

      असदुद्दीन ओवैसी कोणत्या नेत्याच्या निर्णयाबद्दल बोलत होते?

      असदुद्दीन ओवैसी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयाबद्दल बोलत होते. 2017 मध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 15 सार्वजनिक सुट्टया रद्द केल्या. यात ईद मिलाद-उन-नबीची सुट्टी होती. त्याशिवाय डिसेंबर 2023 मध्ये राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी लोकसभा कार्यक्रमाच्या अनुरुप दुपारच्या भोजनानंतर सत्राची वेळ शुक्रवारी दुपारी 2.30 ऐवजी 2 केली होती. मुस्लिम खासदारांना शुक्रवारी नमाज अदा करता यावी, यासाठी दुपारच्या भोजनानंतर 30 मिनिटांचा वेळ ठेवण्यात आला होता, असं अनेक नेत्यांनी सांगितलं.

      प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला किती हजार लोक येणार?

      असदुद्दीन ओवैसी यांनी या दोन उदाहरणांचा दाखला दिला. 22 जानेवारीला अर्धा दिवस सुट्टी देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला बहुमताच तुष्टीकरण ठरवलं आहे. 22 जानेवारीला प्राण प्रतिष्ठेचा भव्य कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. मंदिर ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, राजकीय नेते, प्रसिद्ध व्यक्ती, उद्योगपती आणि संतांसह 7 हजारपेक्षा जास्त लोक प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

      गर्भगृहात रामललाची मुर्ती स्थापित

      गुरुवारी अयोध्या राम मंदिराच्या गर्भगृहात रामललाची मुर्ती स्थापित करण्यात आली. पाच वर्षीय रामाची 51 इंच ऊंचीची काळ्या दगडाची मुर्ती चार तासाच अनुष्ठान आणि मंत्रोच्चारानंतर स्थापित करण्यात आली. 22 जानेवारीला होणाऱ्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याआधी सतत अनुष्ठान आयोजित करण्यात येत आहेत.


      Source

      LEAVE A REPLY

      Please enter your comment!
      Please enter your name here

      Exit mobile version