More
    HomeNationalNational Mathematics Day | कोण आहेत श्रीनिवास रामानुजन, का साजरा केला जातो...

    National Mathematics Day | कोण आहेत श्रीनिवास रामानुजन, का साजरा केला जातो गणित दिन?

    National Mathematics Day अर्थात राष्ट्रीय गणित दिन हा संपूर्ण भारतासाठी अत्यंत अभिमानाचा दिवस. आजच्याच दिवशी महान गणिततज्ज्ञ रामानुजन यांचा जन्म झाला होता. जगभरात हा दिवस ‘गणित दिन’ म्हणून साजरा केला जातो. रामानुजन यांनी फक्त फक्त गणितालाच वेगळी ओळख दिली नाही, तर त्यांनी अशी काही प्रमेय आणि सूत्र दिली ज्यांचा आजही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आणि जे बरेच फायद्याचे ठरतात.

    दरवरर्षी 22 डिसेंबरला देश रामानुजन यांच्या योगदानाची आठवण काढतो. त्यांनी फार कमी वेळातच फ्रॅक्शन, इनफायनाइट सीरिज, नंबर थिअरी, गणिती विश्लेषण या साऱ्याची सर्वांनाच माहिती दिली. गणित क्षेत्रात त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिलं. आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त आणि महावीर यांच्यासह रामानुजन यांचंही नाव घेतलं जातं.

    का साजरा केला जातो हा दिवस ?

    गणिताप्रती सर्वांनाच अभिरुची वाढावी यासाठी हा दिवस इतक्या मोठ्या पातळीवर साजरा केला जातो. अतिशय झपाट्यानं नव्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी झोकून देणाऱ्या नव्या पिढीचा गणिताकडे कल वाढवणं हा त्यामागचा मुख्य हेतू.

    रामानुजन यांच्या जीवनप्रवासावर दृष्टीक्षेप

    श्रीनिवास अयंगर रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 मध्ये कोईंबतूरच्या ईरोड गावात झाला होता. ते एका ब्राह्मण कुटुंबात जन्मले होते. देश आणि जगातील काही महत्त्वपूर्ण गणिततज्ज्ञांमध्ये त्यांचं नाव गणलं जातं. असं म्हटलं जातं की, त्यांना बालपणापासूनच गणिताची आवड होती. भारत सरकारनं त्यांच्या जीवनकार्याचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं 22 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून घोषित केला.

    वयाच्या 32 व्या वर्षी रामानुजन यांचं निधन झालं. 2015 मध्ये त्यांच्या जीवनप्रवासावर प्रकाशझोत टाकणारा ‘The Man Who Knew Infinity’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग साकारण्यात आले होते.
    1976 मध्ये ट्रिनिटी कॉलेजच्या पुस्तकालयात एक जुनं रजिस्टर मिळालं होतं. ज्यामध्ये अनेक प्रमेय आणि सूत्र लिहिण्यात आली आहेत. या प्रमेयांना अद्याप कोणीही सोडवू शकलं नाहीत. हे रजिस्टर ‘रामानुजन नोट बुक’ या नावेही ओळखलं जातं.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img