More
    HomeTV9Marathiअयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेसाठी महाराष्ट्राचा असा सन्मान, एकमेव महिलेस...

    अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेसाठी महाराष्ट्राचा असा सन्मान, एकमेव महिलेस…

    अभिजित पोते, पुणे, दि.19 जानेवारी 2024 | अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास तीन दिवस राहिले आहेत. या सोहळ्याची निमंत्रणे देशभरातील प्रमुख लोकांना दिली गेली आहे. विदेशातून अनेक जणांची उपस्थिती या सोहळ्यास राहणार आहे. या सोहळ्यास महाराष्ट्राचा अनोखा सन्मान झाला आहे. महाराष्ट्रातील महिला कीर्तनकारास या सोहळ्याचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे. राज्यात पाच महिला साधवी आहेत. त्यातील पुणे येथील सुप्रियाताई साठे ठाकूर यांना पुजेचा मान दिला आहे. तसेच देशभरात अकरा दाम्पत्यांना पूजेसाठी बोलवण्यात आले आहे. त्यात नवी मुंबईतील कांबळे दाम्पत्याचा समावेश आहे.

    960) { googletag.cmd.push(function() { googletag.display(“desktop_top_300x250”); }); }]]>

    खेड तालुक्यातील महिलेचे सन्मान

    आयोध्या येथील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला महाराष्ट्रातून महिला कीर्तनकार म्हणून उपस्थित राहण्याचा मान पुण्याच्या खेड तालुक्यातील कीर्तनकार महिला सुप्रियाताई साठे ठाकूर यांना मिळाला आहे. राज्यात पाच साधवी महिला असून यातून सुप्रियाताई साठे ठाकूर या एकमेव पूजेचा मान मिळणाऱ्या कीर्तनकार महिला आहेत. पुणे ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. त्या भूमीतील महिलेस हा मान मिळाला आहे.

    हा आपल्यासाठी सौभाग्याचा विषय

    पाचशे वर्षांपासून आपण ज्याची वाट पाहत होतो, तो क्षण आता जवळ आला आहे. त्या क्षणाचा आपणास भागिदार होता येत आहे, हा आपल्यासाठी सौभाग्याचा विषय आहे. आपणास आमंत्रण मिळाल्यानंतर खूप आनंद झाला. ज्ञानबो, तुकाराम आणि मुक्ताईंची माझ्यावरती कृपी आहे. या संतांच्या कृपेने हा मान आपणास मिळाला असल्याची भावना साठे ठाकूर यांनी व्यक्त केली.

    960) { googletag.cmd.push(function() { googletag.display(‘desktop_medium_300x250’); }); }]]>

    हे सुद्धा वाचा

    नवी मुंबईतील कांबळे कुटुंबाला मान

    नवी मुंबईतील कांबळे कुटुंबाला अयोध्येत श्रीरामाची पूजा करण्याचा मान मिळाला आहे. विठ्ठल कांबळे व उज्वला कांबळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत पूजा करणार आहे. त्यासंदर्भात त्यांना मला फोन आला आहे. विठ्ठल कांबळे हे मुख्यधापक आहेत. या प्राण प्रतिष्ठाच्या सोहळ्यात मोदींसह 11 दाम्पत्य पूजा करणार आहेत.


    Source

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img