More
    HomeDefenceअरबी समुद्रात 3 हजार कोटींचा अमली पदार्थांचा साठा जप्त, भारतीय नौदलाची कारवाई

    अरबी समुद्रात 3 हजार कोटींचा अमली पदार्थांचा साठा जप्त, भारतीय नौदलाची कारवाई

    जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाच्या साठ्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अंदाजे 3000 कोटी आहे. मालदीव आणि श्रीलंकाच्या दिशेना होणाऱ्या अवैध अमली पदार्थ्यांच्या तस्करीच्या दृष्टीने ही मोठी कारवाई आहे. 

    नवी दिल्ली : भारतीय नौदलाने हजारो कोटी रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात मासेमारी करणार्‍या बोटीतून जवळपास तीन हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ नौदलाने ताब्यात घेतले आहे.

    अरबी समुद्रात भारतीय नौसेनेचं जहाज सुवर्णा गस्तीवर होते. त्यावेळी अरबी समुद्रात मासेमारी करणाऱ्या एका बोटीवर काही संशयास्पद हालचाली तेथे जाणवल्या. त्यावेळी  भारतीय नौदलाच्या जवानांची या मासेमारी करणाऱ्या बोटीची तपासणी केली. नौदलाच्या तपासणी दरम्यान यामध्ये 300 किलोग्रॅमहून अधिक अमली पदार्थांचा साठा नौदलाने जप्त केला. 

    बोट आणि त्यातील कर्मचाऱ्यांना पकडून  भारतातील कोची या  केरळमधील जवळच्या बंदरावर पुढील तपासणी करण्यासाठी नेण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या अंमली पदार्थांची  किंमत सुमारे 3000 कोटी रुपये आहे. ही कारवाई केवळ जप्त केलेल्या सामग्री मूल्याच्या दृष्टीकोनातूनच महत्त्वाची नसून, या कारवाईमुळे माक्रन किनारपट्टीवरून भारत, मालदीव आणि श्रीलंका या ठिकाणी  पाठवण्यासाठी केल्या जाणाऱ्या अवैध तस्करीच्या मार्गांचा वापरही बंद करता येणार आहे. 

    पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमेजवळ एका पाकिस्तानी नागरिकाला अटक

    अंमली पदार्थविरोधी तपास यंत्रणांनी पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमेजवळ अमली पदार्थांच्या तस्करीचा प्रयत्न करणार्‍या पाकिस्तानी नागरिकाला अटक केली आहे. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी याबाबत माहिती दिली. पाकिस्तानच्या लाहोरमधील खार्क गावात राहणारा अमजद अली उर्फ ​​मजीद जट्ट (वय 28) याला सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी 6-7 एप्रिलच्या मध्यरात्री फिरोजपूर जिल्ह्यातील खेमकर सीमा भागातून पकडले होते. 20 किलोग्राम हेरॉइन त्यांच्या संपर्कात असणाऱ्या भारतीयांना  देण्यात येणार होते.

    बीएसएफने अमजद अलीजवळून एकूण 20.5 किलो हेरॉईन, एक मोबाइल फोन, एक पॉवर बँक आणि 13 फूट उंच पीव्हीसी पाईप (सीमेच्या कुंपणाखालून अंमली पदार्थांच्या वाहतुकीसाठी वापरलेले) जप्त केले. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी)  उपमहासंचालक (उत्तर) ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितलं की, अमली पदार्थ्यांच्या वाहतुकीशी संबंधित अत्यंत महत्त्वाचे हे प्रकरण असल्याने त्याचा तपास केंद्रीय एजन्सीकडे देण्यात आला आहे.

    ज्ञानेश्वर सिंह पुढे म्हणाले की, ड्रग्सचा व्यापार करणारी ही एक आंतरराष्ट्रीय टोळी आहे, जी सीमेपलिकडून कार्यरत आहे. पुरवठा करणारे सीमा पार करुन अमली पदार्थ भारतात पाठवत आहेत. एनसीबीने दिलेल्या व्हिडिओत अटक केलेला एक पाकिस्तानी नागरिक कबूल करत आहे की,  बीएसएफच्या जवानांनी भारत-पाकिस्तान सीमेवर त्याला अटक केली आहे. 

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img