More
    HomeCoronaEPF Withdrawal : आता आपण कोविड उपचारासाठी पीएफमधून कर्ज घेऊ शकता... जाणून...

    EPF Withdrawal : आता आपण कोविड उपचारासाठी पीएफमधून कर्ज घेऊ शकता… जाणून घ्या नियम

    सध्या कोरोना काळात अनेकांना उपचारांसाठी पैशांची गरज भासत आहे. त्यामुळं आता काही अटींसह आता ईपीएफओमधून कर्ज घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

    epfo-withdrawal

    मुंबई : अनेक कर्मचारी आपलं भविष्य सुरक्षित करण्यासाठी EPF खात्यात गुंतवणूक करतात. आपल्या वेतनामधून ही रक्कम प्रोविडेंट फंडाच्या रुपात कपात केली जाते. जी रक्कम आपल्या EPF खात्यात जमा होते. पीएफची रक्कम काढण्यासाठी काही अटी घातलेल्या आहेत. मात्र सध्या कोरोना काळात अनेकांना उपचारांसाठी पैशांची गरज भासत आहे. त्यामुळं आता काही अटींसह आता ईपीएफओमधून कर्ज घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

    कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) ठरवलेल्या निकषांनुसार कर्मचारी वैद्यकीय कारणांसाठी, नवीन घर घेण्यासाठी, गृहकर्जाची परतफेड आणि लग्नाच्या कारणांसाठी पैसे काढू शकतात.

    ज्यांना आपल्या किंवा आपल्या परिवारातील सदस्याच्या कोविड उपचाराच्या उद्देशाने पैसे काढायचे आहेत.  त्यांना वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत पैसे काढण्याची मुभा देण्यात आली आहे. कोविडमुळे एखादा कर्मचारी किंवा त्याचे पालक, जोडीदार किंवा मुले आजारी पडल्यास सदस्य रक्कम काढू शकतात.  कोविडसह इतर वैद्यकीय उपचारांसाठी एखादा कर्मचारी ईपीएफकडून  पैसे काढू शकतो. या प्रकारच्या ईपीएफ पैसे काढल्यास कोणताही लॉक-इन पीरियड किंवा किमान सेवा कालावधी लागू होणार नाही.

    EPF काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रं
    कर्मचार्‍याकडे युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) असणे आवश्यक आहे.
    कर्मचार्‍याच्या बँक खात्याचा तपशील त्याच्या EPF खात्याशी जुळला पाहिजे.
    नेहमी लक्षात ठेवा ईपीएफचे पैसे त्रयस्थ व्यक्तिच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जात नाहीत.

    आपण कोणत्या परिस्थितीत किती रक्कम काढू शकतो
    आपण आपल्यासाठी, आपली पत्नी, मुलं, आईवडिलांच्या उपचारांसाठी पीएफ खात्यातून पैसे काढू शकतो
    आपण घर, जमीन खरेदीसाठी  PF खात्यातून 90 टक्के रक्कम काढू शकतो.  
    आपण आपल्या किंवा आपल्या मुलांच्या लग्नासाठी 50 टक्के रक्कम काढू शकतो. 
    जर आपण नोकरी सोडली तर आपल्याला एका महिन्यानंतर 75 टक्के रक्कम तर उरलेली रक्कम दोन महिन्यानंतर काढू शकतो.  

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img